
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात पावसाची तुफान बॅटिंग सुरु आहे. मुंबई शहरासह उपनगरात देखील पावसाच्या संततधार कोसळत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून मुंबईकरांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या लोकलसेवेलाही मुसळधार पावसाचा फटका बसला आहे.