

Mumbai Local Passenger Dispute
ESakal
मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या नेहमीच मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे लोकलमध्ये होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीमुळे वाद, हाणामारी, धक्काबुक्की अशा अनेक घटना घडत असल्याचे समोर येते. अशातच सध्या सोशल मीडियावर लोकल ट्रेनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन महिलांमध्ये मराठी भाषेवरून जोरदार वाद होत असल्याचे दिसत आहे.