

Mumbai Local Pink Platform
ESakal
मुंबई : मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी एसआरयूसीसीच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. लोकल ट्रेनमधील महिलांच्या डब्यासाठी ‘पिंक प्लॅटफॉर्म’ प्रस्ताव मांडण्यात आला आहे. महिलांचा डबा नेमका कुठे थांबणार हे सहज ओळखता येण्यासाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यामुळे गर्दीच्या वेळी महिलांना त्यांच्या आरक्षित डब्यात सुरक्षितपणे आणि आरामात चढता-उतरता येणार आहे.