Mumbai Local Trains | सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल सुरु झाल्यानंतर कसं आहे मुंबईतील स्थानकांवरील दृश्य

Mumbai Local Trains | सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल सुरु झाल्यानंतर कसं आहे मुंबईतील स्थानकांवरील दृश्य

मुंबई : अखेर आज तो दिवस उजाडला. मुंबईकर ज्याची अनेक महिने प्रतीक्षा करत होते त्या मुंबईच्या लोकल ट्रेन्स आजपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. कोरोनाचं संकट अजूनही संपलेलं नसल्याने टप्प्या टप्प्यात मुंबईकर नागरिकांसाठी मुंबईतील लोककलने प्रवास करता येणार आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून खरंतर लोकल सुरू करण्याबाबत हालचाली सुरु होत्या. अनेक नागरिकांना लोकल सुरु नसल्याने पर्यायी व्यवस्था बस किंवा टॅक्सीतून प्रवास करावा लागत होता. एकतर कोरोना काळात नोकऱ्यांवर पडलेली कुऱ्हाड किंवा कापले गेलेले पगार यामुळे प्रवाशांचे आर्थिक गणित बिघडले होते. अशात मुंबईकर नागरिकांना लोकल ट्रेन सुरु नसल्याने कामानिमित्त ये जा करण्यासाठी महागड्या पर्यायांचा वापर करावा लागत होता. 

मात्र आजपासून (१ फेब्रुवारी २०२१ ) पासून सर्वसामान्य मुंबईकरांना लोकलने प्रवास करता येणार आहे. आजपासून मुंबईतील लोकल सुरु झाल्याने पहाटेपासूनच तिकीट काऊंटरवर प्रवाशांची लगबल पाहायला मिळाली.

कधी प्रवास करता येईल ?

  • सर्व प्रवाशांना सकाळची पहिली  लोकल ट्रेन ते 7 वाजेपर्यंत
  • दुपारी 12 पासून दुपारी 4 पर्यंत
  • रात्री 9 पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल.

कधी प्रवास करता येणार नाही ?

  • सकाळी 7 ते दुपारी 12
  • दुपारी 4 ते रात्री 9

या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या वर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील.

डोंबिवली रेल्वे स्थानकात तुरळक गर्दी

सर्वसामान्य नागरिकांसाठी आजपासून लोकल सेवा सुरू झाली. गर्दीचे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली रेल्वे स्थानकातही सकाळी प्रवाशांची गर्दी होईल असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र पहिल्या दिवशी सकाळी 6 ते 7 या वेळेत गर्दीच्या या स्थानकात प्रवाशांची तुरळक गर्दी दिसून आली. पहिलाच दिवस असल्याने वर्क फ्रॉम होम करणारा नोकरदार वर्ग अद्याप बाहेर पडलेला दिसून आला नाही. तर अनेकांच्या कार्यालयीन वेळा या सकाळी 10 वाजता असल्याने एवढ्या लवकर जायचे तरी कसे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

mumbai local trains starts for common citizens check full time table and conditions of travel

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com