Mumbai Local सुरू झाल्याने बेस्टच्या ताफ्यातील ST बस कमी होणार

Mumbai Local सुरू झाल्याने बेस्टच्या ताफ्यातील ST बस कमी होणार

मुंबई  : कोरोना काळात अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर पोहोचण्यासाठी आणि "अनलॉक'नंतर नागरिकांच्या प्रवासी वाहतुकीसाठी एसटीने बेस्टच्या उपक्रमासाठी एक हजार बस मुंबईत दिल्या आहेत. आतापर्यंत सरसकट लोकल सेवा बंद असल्याने एसटी आणि बेस्टवर अतिरिक्त भार पडला होता; मात्र आजपासून (ता. 1) राज्य सरकारने सरसकट प्रवाशांसाठी नियोजित वेळी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने आता एसटी महामंडळावरील ताण कमी होणार आहे. 

लोकल सेवा आतापर्यंत सरसकट प्रवाशांसाठी बंद असल्याने रस्तेमार्गी प्रवासी वाहतुकीच्या संख्येत वाढ झाली होती. त्यासाठी बेस्टच्या गाड्या कमी पडत असल्याने मुंबई महानगरपालिकेने एसटी महामंडळातील एक हजार बसची मागणी केली. त्यानुसार राज्यभरातील इतर विभागांतून बससह प्रती बस चार कर्मचाऱ्यांची मुंबईत नियुक्ती केली. त्यामुळे नागरिकांच्या गर्दीचे नियोजन करणे शक्‍य झाले; मात्र एसटीच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा आणि अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला, परंतु आता आजपासून सरसकट लोकल सेवा सुरू होणार असल्याने रस्त्यावरील प्रवाशांची संख्या घटणार आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमामध्ये कर्तव्य बजावणाऱ्या एसटीच्या अतिरिक्त बस कमी करण्याची शक्‍यता आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाचा अद्याप निर्णय झाला नसला तरी बेस्ट उपक्रमात सेवा देणाऱ्या एसटी बसना प्रवाशांचे भारमान लक्षात घेऊनच काही बस कमी करण्यात येणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

नियमित सेवेसाठी 500 बसची मागणी 
यापूर्वीच एसटी महामंडळाला बेस्ट प्रशासनाने 500 बसची नियमित सेवा देण्यासाठी मागणी केली आहे; मात्र त्यावर अद्याप निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे सध्या बेस्ट सेवेत असलेल्या एक हजार बसपैकी 500 बस परत पाठवून शिल्लक राहिलेल्या 500 बस बेस्ट उपक्रमात नेहमीसाठी सेवेत ठेवण्याची शक्‍यताही व्यक्त केली जात आहे.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

The stress on the ST Corporation will be reduced due to local train start in mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com