Four violent incidents in just 12 hours have raised serious concerns over passenger safety in the Mumbai Local Train network.
Sakal
नितीन बिनेकर
मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेचा प्रवास दिवसेंदिवस अधिक असुरक्षित होत असल्याचे चित्र आहे. धावत्या लोकलमध्ये प्राध्यापकांवर झालेला जीवघेणा हल्ला आणि मयंक लोहार हत्येची घटना अद्याप ताजी असतानाच, अवघ्या १२ तासांत उपनगरीय रेल्वेत चार धक्कादायक घटना घडल्या. कुर्ला स्थानकावर हातात काठी घेऊन धावणारी व्यक्ती, धावत्या लोकलमधील सीटच्या वादातून झालेली मारहाण, चर्चगेट-विरार लोकलमध्ये 'मशीन काढ' अशी धमकी दिल्याचा दावा असलेला व्हायरल व्हिडिओ आणि महिला प्रथम श्रेणी डब्यात पेपर स्प्रेचा वापर, या सलग घटनांमुळे मुंबई लोकलमधील प्रवासी सुरक्षेबाबत पुन्हा गंभीर चिंता व्यक्त होत आहे.