
Mumbai Local Viral Video
ESakal
मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. पहाटेपासून सुरु होणाऱ्या पहिल्या लोकल ट्रेनपासून ते अगदी रात्रीच्या शेवटच्या लोकलपर्यंत मोठ्या संख्येंने प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे मुंबई लोकलमध्ये नेहमीच गर्दी असल्याचे दिसून येते. गर्दीतही कामावर तसेच एखाद्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी प्रवासी गर्दीत प्रवास करतात. परिणामी गर्दीत होणारी धक्काबुक्कीमुळे कित्येक प्रवाशांचे भांडण होत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.