"आर्थिक बाबी महत्त्वाच्या, पण..."; लॉकडाउनबद्दल मुंबईच्या पालकमंत्र्यांचे सूचक विधान

Lockdown-Lock
Lockdown-Lock

मुंबई: गेले काही दिवस राज्यात लॉकडाउन लागणार का यावरून चर्चा रंगल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लोकांना नियमांचा पालन करण्याचे आवाहन केले. तसेच, लॉकडाउनची वेळ येऊ शकते असे संकेतही दिले. त्यानंतर आज कोरोनाच्या मुद्द्यावरून मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी माहिती दिली. "पुन्हा लॉकडाउन लावण्यात आला, तर महत्त्वाच्या सेवा आणि रेल्वेबाबतचे निर्णय कोविड टास्क फोर्सच घेईल. मागच्या वेळी आपण कोरोनासाठी तयार नव्हतो. तरीही आपत्ती व्यवस्थापन विभागाने चांगले काम केले. पण आता साऱ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की राज्याची आणि शहरांची आर्थिक घडी नीट बसायला हवीच पण लोकांचा जीव वाचवण्याला आमचं प्राधान्य असणार आहे", असे सूचक विधान राज्याचे मंत्री आणि मुंबई (शहर)चे पालकमंत्री असलम शेख यांनी केले.

"देशात रोज मोठ्या प्रमाणावर कोरोना रूग्ण वाढत आहेत. त्यातही महाराष्ट्रात आणि मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहेत. सध्या बंगाल, केरळमध्ये निवडणुकांचा हंगाम सुरू आहे. तेथे लोक मोठ्या संख्येने एकत्र येत आहेत, पण तिथे मात्र फार केसेस वाढत नाहीत. मग मुंबईतच केसेस का वाढतायत, या मुद्द्याचा सध्या विचार केला जात आहे", असं त्यांनी स्पष्ट केले.

"मुख्यमंत्री म्हणाले लोकांनी नियम मोडले तर लॉकडाउनचा विचार करावा लागेल. आणि राष्ट्रवादीचे नेते म्हणाले की सध्या लॉकडाउनची गरज नाही. दोघांचीही मतं सारखीच आहेत. मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी यांच्यात मतभेद नाहीत. परदेशात अनेक ठिकाणी लॉकडाउन करण्यात आलं आहे", असा दाखला त्यांनी दिला.

"भाजप सरकारवर कायम टीका करत असलं तरी भाजपचं कोरोनाशी काही घेणं देणं नाही. जेव्हापासून कोरोनाने धुमाकूळ घातलाय तेव्हापासून भाजप फक्त सरकार पाडायचा विचार करत आहे. भाजपला रूग्णांची चिंता नाही. त्यांनी हिंदू मुस्लीम वाद आणि इतर मुद्द्यांच्या साथीने सारं काही अस्थिर करायचं आहे", असा आरोप शेख यांनी भाजपवर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com