Loksabha Election 2024 : मुंबईत काँग्रेसची लढण्याआधीच हार!

ज्या मतदारसंघांत काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, संघटनात्मक काम आहे, अशा दोन जागा मागा, असा काँग्रेसचा आग्रह होता.
mahavikas aghadi
mahavikas aghadisakal

मुंबई - मुंबईत लोकसभेच्या किमान दोन जागा हव्यातच, हा काँग्रेसचा आग्रह महाविकास आघाडीत मोठा भाऊ झालेल्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने मान्य तर केला. पण ज्या जागा दिल्या त्या जिंकण्यायोग्य नसल्याची पक्षाची भावना असून श्रेष्ठींना याबद्दलची नाराजी कळविण्यात आली.

महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित झाल्यानंतर मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांपैकी ठाकरे यांची शिवसेना दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, पश्चिम उत्तर मुंबई आणि मुंबई ईशान्य या जागा लढविणार आहे. उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई या दोन जागा काँग्रेस लढविणार आहे.

ज्या मतदारसंघांत काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, संघटनात्मक काम आहे, अशा दोन जागा मागा, असा काँग्रेसचा आग्रह होता. मात्र त्याचा विचार न करता उत्तर मुंबई मतदारसंघ घेण्याचे कारण कार्यकर्त्यांसाठी अनाकलनीय आहे.

उत्तर मुंबई हा भाजपचा गड आहे. येथे भाजपचे पीयूष गोयल यांना रोखण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते विनोद घोसाळकर तयारीत होते. गोयल अमराठी आणि बाहेरचे असल्याने मराठी माणूस असलेले घोसाळकर उत्तम लढा देतील, अशी काँग्रेसजनांचीही खात्री होती. प्रत्यक्षात ही जागा आता काँग्रेसकडेच आली आहे.

कालू बुधेलिया किंवा आमदार अस्लम शेख यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य मुंबईत अल्पसंख्यांकाची मते आहेत. हा मतदार आपल्यासमवेत यावा, यासाठी येथे राज बब्बर किंवा नसीम खान यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

चेन्निथला यांना पत्र

मुंबईत शिवसेने (ठाकरे गट) इतकीच काँग्रेसची ताकद आहे. मात्र, मुंबईतील लोकसभा जागांचे वाटप करताना पक्षाच्या मुंबईतील नेत्यांना जागा वाटपामध्ये विश्वासात घेतले नाही, अशी तक्रार मुंबई काँग्रेसने पक्षाचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मुंबईत काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) या दोन्ही पक्षांना समान जागा मिळायला हव्या होत्या, अशी खंतही या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

पक्षश्रेष्ठींचे मन समजेना

आमच्या श्रेष्ठींच्या मनात नेमके काय आहे ते समजेनासे झाले असून उत्तर मध्य आणि उत्तर मुंबईच्या जागा काँग्रेसने का घेतल्या, असा प्रश्न श्रेष्ठींना विचारण्यात आला आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड स्वत:च नाराज असल्याने पक्षाचे कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत, असे समजते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com