

मुंबई : मराठी भाषा विभागाने आपल्या विविध कामकाज आणि उपक्रमासाठी तसेच मराठी भाषेच्या प्रचार-प्रसार आणि संवर्धनासाठी आज आपले घोषवाक्य आणि बोधचिन्ह जाहीर केले आहेत.'भाषा जनाची भाषा मनाची'असे हे घोषवाक्य असणारा असून बोधचिन्हही आज जाहीर केले.
शालेय शिक्षण व मराठी भाषा विकास मंत्री दीपक केसरकर यांनी मराठी भाषा विभागाच्या बोधचिन्ह आणि बोधवाक्य यासाठी आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील विविध संस्था आणि चित्रकारांकडून हे बोधचिन्ह तयार करून घेण्यात आले आहे. त्यातील एका बोधचीन्हाची अंतिम निवड विभागाने करून आज ते विभागाने जाहीर केले आहे. तर बोधवाक्यासाठीही राज्यभरातील कवी साहित्यिक विचारवंत यांच्याकडून विविध प्रकारचे बोधवाक्य मागविण्यात आले होते. त्यातील भाषा जनाची भाषा मनाची हे बोधवाक्य अंतिम करण्यात आले आहे.
मराठी भाषा विभागाकडून मराठी भाषेच्या प्रचार-प्रसार आणि संवर्धनाच्या दृष्टीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, वाचन प्रेरणा दिन, मराठी भाषा गौरव दिन अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. हे विविध उपक्रम लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आकर्षक भित्तीपत्रके, पताका यांचा वापर करावा लागतो. तसेच, या उपक्रमांची माहिती विविध जाहीरातींद्वारे लोकांपर्यंत पोहोचविण्यात येते. सदर भित्तीपत्रके, पताका आणि जाहीराती यांमध्ये कमीतकमी शब्दांत प्रभावीपणे विभागाची सर्वंकष ओळख लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विभागाने आज नवीन बोधचिन्ह आणि बोधवाक्य जाहीर केले आहे.
प्रत्येक कामकाजात होणारा वापर
मराठी भाषा विकास तिच्या प्रसार आणि प्रसारा संदर्भातील सर्व उपक्रम आणि कार्यक्रमांमध्ये नवीन बोधचिन्ह आणि बोधवाक्याचा प्रभावीपणे वापर केला जाणार आहे. तसेच विभागाने प्रायोजकत्व स्वीकारलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये आणि विभागाच्या जाहीरातींमध्ये या बोधचिन्ह आणि बोधवाक्याचा वापर लगेचच केला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.