Martyr Tribute : सीएसएमटीत 'एनआरएमयू' कडून संविधान दिन साजरा!

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर नॅशनल रेल्वे मजदूर युनियनकडून शनिवारी (ता.२६) संविधान दिन साजरा करण्यात आला.
Martyr Tribute
Martyr TributeSakal
Summary

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर नॅशनल रेल्वे मजदूर युनियनकडून शनिवारी (ता.२६) संविधान दिन साजरा करण्यात आला.

मुंबई - मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर नॅशनल रेल्वे मजदूर युनियनकडून शनिवारी (ता.२६) संविधान दिन साजरा करण्यात आला. तसेच २६/११ च्या दहशतवादी हल्लात शहीद झालेल्या पोलिसांना आणि रेल्वे प्रवाशांना नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू पी नायर आणि अध्यक्ष प्रदीप शिंदे यांनी उपस्थितीत रेल्वे कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली.

नॅशनल रेल्वे मजदूर युनियनकडून संविधान दिनानिमित्य छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात रेल्वे कर्मचारी उपस्थितीत होते. नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू पी नायर यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना संविधान दिनानिमित्य संविधानाचे महत्व पटवून दिले. तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी आज भारतीय संविधानाचे उद्देशिकेचे वाचन केले. याशिवाय सीएसएमटी रेल्वे स्थानकावर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्लाला शनिवारी १४ वर्ष पूर्ण झाले. या दहशतवादी हल्लात शहिद झालेल्या प्रवाशांना आणि पोलिसाना दोन मिनिट मोन ठेवून नॅशनल रेल्वे मजदूर युनियनकडून श्रद्धांजली वाहिली. यावेळी मोठ्या प्रमाणात रेल्वे कर्मचारी उपस्थितीत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com