

Mumbai Mayor Bungalow
Esakal
मुंबईच्या नव्या महापौर रितू तावडे भायखळ्यातील महापौरांच्या अधिकृत बंगल्यात रहायला जाण्याआधी त्यावर करण्यात येणाऱ्या खर्चावरून चर्चेत आल्या आहेत. मुंबईत महापौरांच्या बंगल्याची चर्चा याआधीही अनेकदा झालीय. आता भायखळ्यात नव्या महापौर रितू तावडे तिथं रहायला जाण्याआधी ७५ लाख रुपये दुरुस्तीसह वेगवेगळ्या कामासाठी खर्च केले होते. त्यानंतर साडे तीन कोटीच्या नुतनीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली गेली. आता पुन्हा जवळपास तीन कोटी रुपयांच्या कामासाठी निवीदा मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळे महापौरांच्या बंगल्यावर होणाऱ्या या खर्चावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.