तीन दिवसात पीपीई किटची रक्कम लावली 'इतकी', ऐकून बसेल धक्का!

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 29 जून 2020

कल्याणमध्ये एका खासगी रुग्णालयानं बिलात तीन दिवसांत वापरलेल्या पीपीई किटचे 27 हजार रुपये आकारल्याची घटना घडली आहे.

 

मुंबई : कोरोना व्हायरसनं कहर केला आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतान दिसतोय. यात मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली भागातही या व्हायरसचा प्रार्दुभाव सर्वाधिक झाला आहे. याच दरम्यान कोरोना व्हायरसवर उपचार केल्यानंतर खासगी रुग्णालयांतून अव्वाच्या सव्वा बिल देत असल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. आता कल्याणमध्ये एका खासगी रुग्णालयानं बिलात तीन दिवसांत वापरलेल्या पीपीई किटचे 27 हजार रुपये आकारल्याची घटना घडली आहे. कल्याणमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतेय. शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी खासगी रुग्णालयं उपचार करण्यासाठी सज्ज झालीत. तर दुसरीकडे यातले बहुतेक खासगी रुग्णालय रुग्णांची लूट करत अव्वाच्या सव्वा आकारत आहेत.

प्रेमात 'धोका' मिळाल्यावर 'अशी' रिऍक्ट करतेय तरुणाई, जाणून घ्या काही इंट्रेस्टिंग फॅक्ट्स...
 

कल्याण पूर्वेतील एका खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाला केवळ पीपीई कीटचे 27 हजार रुपये बिल आकारलं आहे. हा केवळ तापाचा रुग्ण होता. यामुळे त्रस्त झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी नगरसेवक महेश गायकवाड यांच्याकडे मदत मागितली. 

कल्याण पूर्वेला राहणारे रविंद्र राजभर हे चक्कीनाका परिसरात असलेल्या एका मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांना ताप आला होता. खासगी रुग्णालयातल्या मॅनेजमेंटनं रवींद्र यांच्या उपचाराचे बिल त्यांच्या हातात दिलं. तेव्हा त्य बिलामध्ये तीन दिवसात पीपीई किटचे तब्बल 27 हजार रुपये आकारले होते. 

महामुंबईतील 'या' क्षेत्रांमध्ये पुन्हा लॉकडाऊन; संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी

रुग्णालयाचा हा गलथान कारभार रुग्णाच्या नातेवाईकांनी कल्याण पूर्व मधील शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांच्या कानावर घातला. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनी सर्व घडलेला प्रकार त्यांना सांगितला. गायकवाड यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली आणि रुग्णालय प्रशासनाला याबाबत जाब विचारला. गायकवाड यांनी लगेचच बिलाची रक्कम कमी करुन घेतली. तसंच रुग्णालय प्रशासनाने चूक झाल्याचं सांगत पीपीई किटचे दर कमी केले.

कोरोना काळात माणुसकी दाखवा रुग्णांच्या असहाययतेचा फायदा घेऊ नका असं म्हणत यापुढे कधीही रूग्णांकडून जादा रक्कमेची लूट केली. तर गाठ माझ्याशी आहे, असा इशाराही महेश गायकवाड यांनी हॉस्पिटलला दिला आहे.

कोरोना रोखण्यासाठी मायानगरी 24 तास सुरू राहणार? वाचा ही भन्नाट आयडिया...

'या' रुग्णालयाला थेट हायकोर्टाचा दणका

अव्वाच्या सव्वा बिल आकारणाऱ्या मुंबईतल्या के.जे. सोमय्या रुग्णालयाला मुंबई हायकोर्टानं चांगलाच दणका दिला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांकडून आकारलेले 10 लाख 6 हजार 205 रुपये न्यायालयात जमा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शीव येथील के. जे. सोमय्या रुग्णालयाला दिलेत. 

कोरोना बाधितांवर मोफत उपचार

राज्यातला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महात्मा फुले जन आरोग्य आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ सर्वच नागरिकांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार शासकीय, महापालिका रुग्णालयांबरोबरच या योजनेत सहभागी असलेल्या एक हजार रूग्णालयांमध्येही कोरोनाबाधितांवर मोफत उपचार करण्यात येतील. यासाठी रूग्णांना कोणत्याही कागदपत्राची पडताळणी किंवा प्रक्रिया करावी लागणार नाही. या योजनेचा लाभ कोरोनाबाधित रुग्णांना 31 जुलै पर्यंत घेता येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: only ppe insect charged rs 27000 in bill hospital in kalyan mhss