मोठी बातमी - मुंबईच्या महापौर १४ दिवस क्वारंटाईनमध्ये

मोठी बातमी - मुंबईच्या महापौर १४ दिवस क्वारंटाईनमध्ये

मुंबई - मुंबईकरांची चिंता सध्या तरी कमी होताना पाहायला मिळत नाहीये. खरंतर आज अनेक ठिकाणी (ग्रीन झोनमध्ये) अर्थव्यवस्थेची चक्र पुन्हा फिरायला सुरवात करण्याच्या उद्धेशाने काही उद्योग सुरु करण्याची सशर्त परवानगी मिळालीये. अशात देशाची आर्थिक राजधानी कधी पूर्ववत होणार याचाच विचार सर्वजण करतायत.

मात्र मुंबईकरांची चिंता वाढताना पाहायला मिळतेय. याला कारण म्हणजे मुंबईतील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालीये. अशात मुंबईतील एकूण ५३ पत्रकारांना देखील कोरोनाची लागण झालीये. या सर्वांच्या संपर्कात मुंबई महापौर किशोरी पेडणेकर या गेल्या काही काळात आल्या असल्याने आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वतःला क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतलाय.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, त्यांचे ड्रायव्हर यांची SWAB टेस्ट करण्यात आलेली आहे. महापौर निवास देखील महापालिकेकडून सॅनिटाईझ करण्यात आलं असून आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहणार आहेत. 

मुंबईतील पत्रकारांनाही कोरोनाची लागण :  

मुंबई महापालिका आणि टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्या वतीने मुंबईतही पत्रकारांची कोरोना चाचणी करण्यात आलेली. यामध्ये पत्रकार, फोटोग्राफर्स आणि व्हिडीओ जर्नालिस्ट यांची चाचणी करण्यात आलेली. एकूण १६७ पत्रकारांची कोरोना टेस्टमधील ५३ पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. यातील काही पॉझिटिव्ह रुग्णांच्या किशोरी पेडणेकर संपर्कात आल्याने त्यांनी स्वतःला क्वारंटाईन केलंय. 

mumbai mayor kishori pednekar to stay in home quarantine for next 14 days

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com