आज रेल्वेच्या दोन मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या आजच्या मेगाब्लॉकचं वेळापत्रक

आज रेल्वेच्या दोन मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या आजच्या मेगाब्लॉकचं वेळापत्रक

मुंबई: आज 7 फेब्रुवारी. आज रविवार असल्यानं रेल्वे प्रशासनानं मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावर देखभाल-दुरुस्तीसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. यावेळी सकाळी 10.00 ते संध्याकाळी 4.30 या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना मुख्य मार्गाने प्रवास करण्याची परवानगी दिल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

कुठे : माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद 
कधी : सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत

परिणाम : सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा येथे डाऊन धीम्या मार्गावर वळविल्या जातील. सायन व मुलुंड दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील आणि आपल्या नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा  पोहोचतील. ठाण्यापुढील जलद लोकल मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील.  ठाणे येथून सुटणा-या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि मुलुंड ते दादर दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. दादरनंतर जलद सेवा परळ येथे अप जलद मार्गावर  वळविण्यात येतील. 

कुठे : पनवेल-वाशी अप आणि डाऊन, पनवेल-बेलापूर/नेरुळ-खारकोपर अप आणि डाऊन 
कधी : सकाळी 10 ते दुपारी 4.16 दरम्यान

परिणाम : पनवेल / बेलापूरहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी ते  पनवेल / बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहे. पनवेलहून ठाणेकडे जाणाऱ्या ट्रान्स हार्बर मार्गावरील अप सेवा आणि ठाणे ते पनवेल / बेलापूर साठी जाणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा रद्द राहतील. या ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - वाशी विभागात विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. ठाणे-वाशी/ नेरुळ सेवा ब्लॉक दरम्यान सुरू असेल.

कुठे : वसई रोड ते भाईंदर अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : रात्री 12.30 ते पहाटे 4

परिणाम : या ब्लॉक कालावधीत अप-डाऊन जलद मार्गावरील काही लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. मात्र आज दिवसभर पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कोणताही मेगाब्लॉक नसेल.

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai mega block western and central railway sunday 7th february timetable

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com