
मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या मेट्रो-३ च्या बीकेसी-आचार्य अत्रे चौकपर्यंतच्या (वरळी) टप्पा दोनचे शुक्रवारी (ता. ९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री बीकेसी ते सिद्धिविनायक स्थानकादरम्यान मेट्रोने प्रवास करणार आहेत. शनिवारपासून ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.