
"Passengers safely evacuated after sparks seen inside Mumbai Metro Aqua Line underground train near Santacruz station."
esakal
विजय बाटे
मुंबई मेट्रोच्या पहिली पूर्णपणे भूमिगत एक्वा लाईनवर मोठी दुर्घटना टळली आहे. विलेपार्लेहून निघालेली मेट्रो सांताक्रूझच्या दिशेने जाताना गाडीत स्पार्क झाल्याने सर्व प्रवाशांना सांताक्रूझ स्टेशनवर उतरवण्यात आले आहे. त्यांना दुसऱ्या मेट्रोने रवाना केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.