Mumbai Metro Disrupted
ESakal
मुंबई
Mumbai Metro News: मुंबई मेट्रो सेवा विस्कळीत! दोन मार्गिकांवर तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा खोळंबा
Mumbai Metro Disrupted News: मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असूनही महा मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनने या व्यत्ययाच्या कारणाबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.
मुंबई मेट्रो विस्कळीत झाली आहे. गुंदवली–अंधेरी वेस्ट मार्गावरील मेट्रो सेवा दोन्ही दिशांनी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मेट्रो उशिरा धावत आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे. कांदिवली पश्चिम स्थानकात एक मेट्रो गाडी गेल्या पाच मिनिटांहून अधिक वेळ प्लॅटफॉर्मवरच थांबलेली दिसली.

