

Mumbai Metro Fare Hike
ESakal
मुंबई : लोकलनंतर मेट्रो मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी बनली आहे. परवडणारे भाडे आणि सुसाट, आरामदायी प्रवासामुळे प्रवाशांकडून मेट्रो सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र मेट्रो प्रवासाचा प्रवाशांच्या खिशाला फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्य सरकार मेट्रोच्या भाड्यात वाढ करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.