
Esakal
मुंबई : मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गाचे काम पूर्ण केल्यानंतर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने आता वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंतच्या दुसऱ्या मेट्रो मार्गावर लक्ष केंद्रित केले आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी, एमएमआरसीने अंतरिम सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हा सल्लागार नियोजन, डिझाइन, बांधकामाचे निरीक्षण आणि गुणवत्ता नियंत्रण सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. सल्लागार प्रकल्प वेळेवर आणि स्थापित मानकांनुसार पूर्ण होईल याची खात्री देखील करेल.