esakal | मेट्रो वन स्थानकांना अत्याधुनिक करण्यासाठी 'रंग दे मेट्रो' मोहीम
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai metro painting

मेट्रो वन स्थानकांना अत्याधुनिक करण्यासाठी 'रंग दे मेट्रो' मोहीम

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो 1 (Mumbai metro) मार्गाला 7 वर्षे पूर्ण झाले असून मेट्रो प्रवाशांचा प्रवास नाविन्यपूर्ण होण्यासाठी, अद्ययावत करण्यासाठी नवनवीन बदल केले जात आहेत. मेट्रो प्रशासनाकडून (metro authorities) मेट्रोचे संकेतस्थळात बदल करणे, 'वन मुंबई स्मार्ट कार्ड' सुविधा आणली आहे. तर, आता मेट्रो स्थानकाचे रुपडे पालटण्यासाठी 'रंग दे मेट्रो' मोहीम (metro campaign) सुरू झाली आहे. प्रवाशांच्या संकल्पनेतील पेंटिंग मेट्रो पिलर, भिंतींवर साकारली जाणार आहे.

हेही वाचा: मुंबई : बचत गट, बेरोजगारांना महापालिकेचा दिलासा

मुंबई मेट्रो वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये प्रवाशांना जोडण्याचे काम करत आहे. यामधील, त्यापैकी माझी मेट्रो महोत्सव उपक्रम साजरा केला जाणार आहे. मुंबई मेट्रो वनद्वारे दरवर्षी माझी मेट्रो महोत्सव केला जातो. प्रत्येक प्रवाशाला मेट्रो ही 'माझी' असल्याची आणि प्रेमाची भावना तयार करण्यासाठी मेट्रो स्थानकांना कलात्मक जागा म्हणून विकसित करण्यासाठी आणि साकार करण्यासाठी 'रंग दे मेट्रो'ची मोहीम आखली आहे.

कोरोना महामारीच्या काळात जीवनात नवीन सकारात्मक रंग भरण्यासाठी माझी मेट्रो महोत्सवातील रंग दे मेट्रो मोहीम 17 ऑगस्टपासून सुरू झाली. तर, या मोहिमेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबरपर्यंत होती. या मोहिमेत राष्ट्रीय कलाकारांसह स्थानिक कलाकारांनी सहभाग घेतला आहे. तर, 30 सप्टेंबरपर्यंत एकूण 5 हजार 500 जणांनी नोंदणी केली आहे. तसेच माझी मेट्रोच्या 2 लाख 20 हजारांहून अधिक पोस्ट आणि 78 हजारांहून अधिक जणांनी संकेतस्थळाला भेट नोंदविला आहे.

हेही वाचा: BMC : सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पुनर्विकासाला स्थायी समितीची मंजुरी

राष्ट्रीय अकादमी पुरस्कार विजेते आणि ललित कला अकादमीचे कार्यकारी मंडळ सदस्य किशोर कुमार दास आणि ललित कला अकादमीचे कार्यकारी सदस्य आणि कलाकार ममता सिंग यांच्या संयुक्त विद्यमानाने मोहीम सुरू आहे. यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेत सहभागी होणाऱ्या कलाकारांच्या पेंटिंग निवडल्या जाणार आहेत.

मेट्रोच्या सर्व स्थानकाच्या आतील भाग ज्युरीने निवडलेल्या विविध कला संस्थांतील नामांकित कलाकार आणि नवोदित कलाकारांच्या कलाकृतींनी रंगवले जातील. याव्यतिरिक्त, मेट्रोचे एक स्थानकावर स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असताना देशाच्या ऐक्य, एकतेच्या स्मरणार्थ पेंटिंग केली जाणार आहे. या मोहिमेला कलाकारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ही मोहीम साधारण डिसेंबरपर्यंत सुरूच असणार असून आता ज्यूरीद्वारे चांगला संदेश देणारी पेंटिंग निवडण्यात येईल. एकूण 20 हजार चौ.फूट मेट्रो भिंती, पिलरवर पेंटिंग साकारली जाईल. त्यामुळे सर्व पेंटिंगचे काम झाल्यावर मेट्रोच्या 4 लाख 50 हजार प्रवाशांना दररोज पेंटिंग पाहता येतील, अशी माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली.

loading image
go to top