
मुंबईतील पहिल्याच मुसळधार पावसात मेट्रो३च्या आचार्य अत्रे चौक स्टेशनमध्ये पाणीच पाणी झालं. पायऱ्यांवरून स्टेशनमध्ये पाणी शिरल्यानं मेट्रोची सेवा स्थगित करावी लागली. १७ दिवसांपूर्वीच या स्टेशनचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. मेट्रो स्टेशनमध्ये पाणी शिरून घडलेल्या घटनेवर प्रशासनाने मात्र काम पूर्ण झालं नसल्याचं सांगितलं आहे. तसंच नियोजित काम १० जूनपर्यंत पूर्ण होणार होतं, पण त्याआधीच पाऊस आला असंही मेट्रो प्रशासनाने सांगितलं.