
“MMRDA to temporarily shut Mumbai Monorail from September 20, 2025, for safety upgrades, new rakes, and advanced CBTC signaling system.”
esakal
मुंबई मोनोरेल सेवा २० सप्टेंबर २०२५ पासून अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहे.
नवीन रेक, प्रगत CBTC सिग्नलिंग सिस्टम आणि आधुनिकीकरण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
अपग्रेडेशननंतर सेवा अधिक सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह होईल.
मुंबईतील मोनोरेल सेवा २० सप्टेंबरपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येणार आहे. यापूर्वी, मोनोरेल दोनदा मध्येच बंद पडली होती, ज्यामध्ये अनेक प्रवासी अडकले होते. या दरम्यान, अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. सततच्या तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेल ट्रॅकवरच बंद पडत आहेत म्हणूनच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) २० सप्टेंबर २०२५ पासून सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून भविष्यात मुंबई मोनोरेल अधिक सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह बनेल.