नाट्यगृहात आता 'नो ट्रिंग ट्रिंग'; मोबाईल जॅमर बसविणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

नाट्यगृहात प्रयोगादरम्यान, प्रेक्षकांकडून फोनचा वापर होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत कलाकारांनीही अशी मागणी केली होती. अभिनेता सुमीत राघवनने नाशिकमध्ये 'नॉक नॉक सेलिब्रिटी' या नाटकादरम्यान मोबाईल वाजल्याने प्रयोग थांबवला होता. यावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.

मुंबई : नाट्यप्रयोगादरम्यान, मोबाईलचा वापर करण्यामुळे नाट्यगृहातील शांततेचा भंग होऊन, कलाकरांचे लक्ष विचलित होते अन्, नाट्यरसिकांचा रसभंग होतो. त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने नाट्यगृहांमध्ये जॅमर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नाट्यगृहात प्रयोगादरम्यान शांतता राखली जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   
नाट्यगृहात प्रयोगादरम्यान, प्रेक्षकांकडून फोनचा वापर होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत कलाकारांनीही अशी मागणी केली होती. अभिनेता सुमीत राघवनने नाशिकमध्ये 'नॉक नॉक सेलिब्रिटी' या नाटकादरम्यान मोबाईल वाजल्याने प्रयोग थांबवला होता. यावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. त्यावेळी अनेक अभिनेत्यांनी सुमीतच्या पाठीशी उभे राहून नाटकादरम्यान मोबाईल वापरण्यास विरोध केला होता. 

कांदा न खाल्ल्याने कोणीही मरत नाही - बच्चू कडू 

दरम्यान, नाट्यप्रयोगादरम्यान, मोबाईलचा वापरण्यास बंदीचा ठराव मुंबई महापालिकेत 25 जुलैला मांडण्यात आला. हा प्रस्ताव महापालिकेने मान्य केला असून नाट्यगृहांमध्ये जॅमर बसविणार आहे.

आणखी वाचा : No Mobile In Theater : सुमीतने घेतलेली भूमिका योग्यच; कलाकारांचा पाठिंबा 
आणखी वाचा :  No Mobile In Theater : कायमस्वरूपी तोडगा निघावा
आणखी वाचा :  No Mobile In Theater : नाटक चालू आहे, पण शांतता कुठंय?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai municipal administration decides to set jammer in theaters