

BMC
Esakal
मुंबई : मुंबई महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. सुरक्षा रक्षकांची २,३७९ पदे रिक्त असल्याची बाब समोर आली आहे. महापालिकेच्या चार हजार ९६ मंजूर पदांपैकी निम्म्याहून अधिक पदे रिक्त असल्याने मुख्यालय, रुग्णालये, महापालिका कार्यालये आणि उद्यानांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे सध्या कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे, तर अनेक उद्यानांची सुरक्षा कंत्राटदारांच्या भरवशावर सुरू आहे.