Mumbai: मुंबई महापालिकेला मिळणार नवे सभागृह! सहा मजली इमारत, सांस्कृतिक दालन, व्यायामशाळा अन् प्रशस्त सभागृह; ४४ कोटींचा प्रस्ताव

BMC New Sabhagruh: मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील जागा अपुरी पडत असल्याने नवी सुसज्ज इमारत बांधण्यात येणार आहे. यासाठी ४४ कोटी ८७ लाख रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर केला आहे.
BMC

BMC

ESakal

Updated on: 

मुंबई : मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील जागा अपुरी पडत असल्याने शेजारच्या 'टाऊनहॉल जिमखाना' च्या भूखंडावर प्रशासकीय व क्रीडा वापरासाठी सुसज्ज इमारत बांधण्यात येणार आहे. सुमारे ३२० नगरसेवक व लोकप्रतिनिधींची क्षमता असलेल्या सभागृहासह महापौर, उपमहापौर आणि विरोधी पक्षनेत्यांसाठी स्वतंत्र दालने, पत्रकार कक्ष, व्यायामशाळा अशा विविध सुविधा या इमारतीत असणार आहे.

Loading content, please wait...