Coastal Road: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मुंबई कोस्टल रोडसंदर्भात नवीन वाहतूक नियम लागू, महापालिकेचा निर्णय

Coastal Road Traffic Rules: मुंबई कोस्टल रोड बोगद्यात एका कारला आग लागल्याची घटना घडली होती. त्यामुळे कोस्टल रोडसंदर्भात नवीन वाहतूक नियम लागू करण्यात आले आहेत.
Coastal Road Traffic Rules

Coastal Road Traffic Rules

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड बोगद्यात नुकतीच एका धावत्या कारला आग लागल्याची दुर्घटना घडली होती. या घटनेची गंभीर दखल घेऊन महापालिकेने वाहनचालकांसाठी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. वाहनचालकांनी बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वी वाहनाची तांत्रिक स्थिती योग्य असल्याची खात्री करून करावी, बोगद्याच्या आत प्रवासादरम्यान वाहनातून धूर निघाल्यास किंवा आग लागल्यास गाडी तत्काळ रस्त्याच्या डाव्या कडेला सुरक्षित ठिकाणी थांबवून इंजिन बंद करावे, या मार्गदर्शक सूचनांचा यात समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com