मुंबईच्या रुग्णालयांत होतेय 'ही' अधिकची तयारी; यांना कसले संकेत म्हणावं ?

मुंबईच्या रुग्णालयांत होतेय 'ही' अधिकची तयारी; यांना कसले संकेत म्हणावं ?
Updated on

मुंबई , ता. 5 : कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून मे महिन्याच्या मध्यापर्यंत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी तयारी म्हणून प्रमुख रुग्णालयांची रुग्ण क्षमता वाढवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने मुंबईला रेड झोनमध्ये टाकण्यात आलय. पालिकेने सर्वच प्रमुख रुग्णायांत विशेष कोविड ओपीडी सह वॉर्ड सुरू केले असून रुग्णांवर उपचार सुरू केले आहेत. सध्या मुंबईत 9115 पेक्षा अधिक रुग्ण आहेत. साधारणता 15 मे नंतर ही रुग्णासंख्या अधिक वाढणार असल्याचा अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवला आहे. रुग्णसंख्या वाढणार असल्याने प्रमुख रुग्णालयांची क्षमता वाढवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

सध्या मुंबईत साधारणता 3 हजाराच्या आसपास खाटा आहेत. त्यामध्ये आणखी 1750 खाटांची भर घालून 4750 इतक्या करण्यात येणार आहेत. केईएम, नायर, सेव्हन हिल्स आणि सेंट जॉर्ज या प्रमुख रुग्णालयांमध्ये या खाटा वाढवण्यात येणार आहेत. यातील नायर, सेव्हन हिल्स आणि सेंट जॉर्ज ही पूर्णतः कोविड रुग्णालये बनवण्यात आली असून याच रुग्णालयांत सर्वाधिक रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व खोपडपट्टांतील ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी पालिकेने सुरू केली आहे. पालिकेने 27 एप्रिल पासून आता 3 मे पर्यंत 3 लाख 43 हजार 717 घरांचे सर्वेक्षण केले आहे. यातील. 42 हजार 752 ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य  तपासणी केली आहे. त्यातील 691 ज्येष्ठ नागरिकांना सर्वंकष उपचारासाठी पालिकेने सरकारी तसेच खासगी रुग्णालयांत संदर्भित केले आहे. 

mumbai municipal corporation is increasing bed capacity in the city check reasons for this

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com