esakal | तिसऱ्या लाटेसाठी मुंबई पालिकेची तयारी
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

तिसऱ्या लाटेसाठी मुंबई पालिकेची तयारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत (Mumbai) गेल्या एका आठवड्यापासून कोरोनाचे (Corona) रुग्ण वाढत आहेत. अशा स्थितीत पुन्हा एकदा कोरोना (Corona) प्रबळ होताना दिसत आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने (Municipal) आधीपासूनच कंबर कसली आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या मते, तिसऱ्या लाटेत मुंबईत (Mumbai) 1.25 लाख लोक कोविडमुळे (Covid) प्रभावित होऊ शकतात. यामध्ये, जवळपास 20 टक्के म्हणजे 20,000 नागरिकांना रूग्णालयात (Hospital) दाखल करण्याची आवश्यकता भासू शकते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनुभव घेतल्यानंतर, महापालिकेने तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्याची तयारी सुरू केली आहे, मग ती ऑक्सिजन बेडची गरज असो किंवा ऑक्सिजनची. यासाठी महानगरपालिकेने आधीच अनेक जम्बो कोविड केंद्र, मुलांसाठी विशेष केंद्रे इत्यादींची व्यवस्था केली आहे.

महापालिका उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले की, तिसरी लाट मोठी असेल की छोटी हे सांगणे कठीण आहे. यावर दररोज अंदाज बांधला जात आहे, परंतु आम्ही आमच्याकडून सर्व तयारी केली आहे. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनसाठी पीएसए प्लांट उभारणे असो किंवा इतर कंपन्यांना पुरवठा करणे असो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जेवढे रुग्ण आढळले तितकेच रुग्ण तिसऱ्या लाटेत सापडले तर ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून तयारी सुरू आहे. आता उत्पादन क्षमता वाढली आहे. सध्या बेड्सही पुरेसे आहेत. सध्या रुग्णांची संख्या कमी आहे, त्यामुळे अनेक बेड्स रिक्त आहेत.

हेही वाचा: मुंबईत मनसेचं धाकुमाकूम, थर रचून फोडल्या दहीहंड्या

श्वास थांबू देणार नाही -

 जर कोविडची तिसरी लाट आली तर आमचा अंदाज आहे की आम्हाला दररोज 250 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे, रिफिलिंग प्लांट स्थापित करण्याचे काम सुरू केले आहे. अनेक रुग्णालयांमध्ये पीएसए प्लांटही उभारण्यात आले आहेत. सध्या आम्ही 50 मेट्रिक टन उत्पादन करत आहोत, येत्या एक ते दीड महिन्यात क्षमता 150 मेट्रिक टनपर्यंत वाढेल. त्यानंतर, रिफिलिंग प्लांट ही आहे आणि आम्ही ऑक्सिजन सिलिंडरचा बॅक अप देखील ठेवला आहे. अंदाजित जर रुग्णापेक्षा जास्त रुग्ण आले तर यावेळी ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.

- सुरेश काकाणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त

हेही वाचा: मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 441 नव्या रुग्णांची भर; 3 जणांचा मृत्यू

30 हजारांपर्यंत बेड्सची सुविधा -

 सध्या मुंबईतील महापालिका रुग्णालये आणि कोविड केंद्रांमध्ये एकूण 18, 557 बेड कार्यरत आहेत, त्यापैकी केवळ 2,017 बेड भरलेले आहेत. आवश्यक असल्यास, बेडची संख्या 30, 000 पर्यंत वाढवली जाऊ  शकते. कारण अनेक बेड अजूनही सक्रिय केलेले नाहीत.

60% बेड ऑक्सिजन सपोर्टेड -

पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या मुंबईत उपलब्ध असलेल्या सर्व  बेड्सपैकी 60 टक्के ऑक्सिजन सपोर्टेड आहेत. सध्या 7, 691 सक्रिय ऑक्सिजन बेड, 2,238 आयसीयू बेड आणि 1,287 व्हेंटिलेटर आहेत, त्यापैकी 6,821 ऑक्सिजन बेड, 1,636 आयसीयू बेड आणि 8,77 व्हेंटिलेटर सपोर्ट बेड रिक्त आहेत. जर या वेळी दुसऱ्या लाटेइतके रुग्ण आले तर बेडसाठी काळजी करण्याची गरज पडणार नाही.

हेही वाचा: मुंबईत पर्यटनाच्या दागिन्यात नवा ‘मोती’

उच्च जोखीम आणि लक्षणे नसलेल्यांसाठी 70 हजार बेड -

मुंबईत, कोविड केअर सेंटर 1 (हाय रिक्स) साठी सुमारे 25, 000 बेड आणि कोविड केअर सेंटर 2 (एसिम्प्टोमेटिक) साठी 45,000 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. म्हणजेच एकूण 70,000 बेड असतील.

मुलांसाठी 1500 बेड्स -

कोरोनाची तिसरी लाट मुलांवर अधिक परिणाम करू शकते, अशा परिस्थितीत, मुंबईतील कोविड केअर सेंटर, विविध रुग्णालयांमध्ये सुमारे 1,500 बेड मुलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. गरज पडल्यास बेडची संख्या वाढवण्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

1.35 लाख रेमडेसिविर उपलब्ध -

 महापालिकेकडे एकूण 2 लाख रेमडेसिवीर कुपी उपलब्ध होत्या, त्यापैकी 65 हजार कुपी वापरल्या गेल्या. सध्या पालिकेकडेल 1.35 लाख कुपी उपलब्ध आहेत.

loading image
go to top