

Dirty public parking lot at Prabhadevi
ESakal
नितिन जगताप
मुंबई : मुंबई महापालिकेने उभारलेले प्रभादेवी येथील सार्वजनिक वाहनतळ अक्षरशः दुर्गंधीचे केंद्र बनले आहे. येथे नियमांचे खुलेआम उल्लंघन, सर्वत्र साचलेला कचरा, भिंतींवर लघुशंका यामुळे पसरलेली असह्य दुर्गंधीची परिस्थिती निर्माण झाली आहे. एकमेव स्वच्छतागृहाला टाळे लागले असून, संपूर्ण वाहनतळाच्या संचालनासाठी मनुष्यबळ अपुरे असल्याने वाहनचालकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.