मुंबई महापालिकेकडून कुपोषित बालकांचे सर्वेक्षण सुरू | Malnourished Children | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai-Municipal
मुंबई महापालिकेकडून कुपोषित बालकांचे सर्वेक्षण सुरू

मुंबई महापालिकेकडून कुपोषित बालकांचे सर्वेक्षण सुरू

मुंबई - कुपोषित बालकांचा शोध घेण्यासाठी मुंबई महापालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे. अशी बालके शोधून त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या नोंदीनुसार पालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या दोन लाखांहून अधिक बालकांपैकी सात हजारांहून अधिक बालके कमी वजनाची आढळली होती. क्षयरोग रुग्णांच्या शोधमोहिमेबरोबरच कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

मुंबईतील मानखुर्द, गोवंडी, मालाड, मालवणी या परिसरासह आदिवासी पाड्यात कमी वजनाची बालके नोंदवली जातात. आता पालिका संपूर्ण मुंबईतील कुपोषित बालकांचा शोध घेणार आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी कोरोना संशयितांचा शोध घेत असताना क्षय रुग्ण शोधणे हे सर्वेक्षण सुरू असून या मोहीमेतच कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात कुपोषित बालके आढळल्यानंतर त्यांच्यावर पालिकेच्या रुग्णालयात उपचार करण्यात येतील असे सांगण्यात आले.

हेही वाचा: मिलिंद तेलतुंबडेवरील ५० लाखाचं बक्षीस पोलिसांना मिळणार?

महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करण्यात येते. काही वर्षांपूर्वी दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची तपासणी झाली होती. त्यात सात हजारहून अधिक बालके कमी वजनाची आढळली होती. तात्काळ उपचार कुपोषित बालकाची नोंद झाल्यावर गरज पडल्यास त्याला वैद्यकीय उपचार, पौष्टिक आहार दिला जाईल. राष्ट्रीय महिला बालकल्याण योजनेंतर्गत व महापालिकेच्या माध्यमातून उपचार करण्यात येतील असे सांगण्यात आले.

loading image
go to top