मुंबई : पालिकेचे पाऊल सौर उर्जेकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BMC

मुंबई : पालिकेचे पाऊल सौर उर्जेकडे

मुंबई : विजेवरील खर्च कमी करण्यासाठी महानगर पालिका आता पर्यावरण पुर्वक विज वापरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पालिकेच्या मालमत्तांमध्ये लहान लहान सौर उर्जा प्रकल्प उभारण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.वांद्रे येथे पंपिंग स्टेशन मध्ये असा लहान सौर उर्जा प्रकल्प उभारण्यासाठी निवीदा मागविण्यात आला आहे. 230 किलोवॅट क्षमतेचा हा प्रकल्प असून कार्याध्येश मिळाल्यानंतर तीन महिन्यात हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

महानगर पालिकेला केंद्रीय वित्त आयोगाकडून 325 कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे.या अनुदानातील 80 टक्के रक्कम पर्यावरण पुरक कामासाठी खर्च करण्याचे निर्देश राज्य सरकारने महानगर पालिकेला दिले आहेत.त्यातच आता मुंबईच्या विकासासाठी पर्यावरण पुरक आराखडा तयार केला जात आहे.या पालिका तयार करत असलेल्या या आराखड्यात पर्यावरण पुरक विकासाला प्राधान्य देण्यात येणार आहे.पालिका आता ईलेक्‍ट्रीक वाहाने वापरण्यास प्राधान्य देणार आहे.या वाहानांच्या चार्जिंग बरोबर पालिकेच्या नियमीत कामकाजाठी लागणारी जास्तीत जास्त पर्यावरण पुरक मार्गाने निर्माण करण्यास प्राधान्य दिले जाईल असा हा आराखडा तयार केला जात आहे.

हेही वाचा: ...म्हणून केला प्राणघातक हल्ला; मुंबईच्या विलेपार्लेत एकावर चाकुने वार

पालिकेने आता जेथे शक्‍य होईल तेथे लहान लहान सौर उर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार वांद्रे येथील मलजल पंपिंग स्टेशन मध्ये रुफटॉप सौर उर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.यासाठी निवीदा मागविण्यात आल्या आहेत.

- मध्य वैतरणा जलशयात महानगर पालिका 80 मेगावॅट क्षमताचे तरंगता सौर उर्जा प्रकल्प उभारत आहे.त्याच बरोबर 20 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प उभारला जात आहे.

-नरीमन पॉईंट ते वरळी पर्यंतच्या सागरी किनरी मार्गाच्या परीसरातही महानगर पालिका सौर उर्जा प्रकल्प उभारणार आहे.त्यासाठी जागा निश्‍चित करण्यात येतील.

loading image
go to top