Mumbai News : गोखले ब्रीजवर हलक्या वाहनांना प्रवेशाबाबत पालिका लवकरच निर्णय घेणार

गोखले ब्रीजवर हलक्या वाहनांसाठी प्रवेश देता येईल का? याबाबतचा निर्णय जितका लवकर शक्य आहे तितक्या लवकर घेण्यात येईल.
Gokhale Bridge Andheri
Gokhale Bridge AndheriSakal
Summary

गोखले ब्रीजवर हलक्या वाहनांसाठी प्रवेश देता येईल का? याबाबतचा निर्णय जितका लवकर शक्य आहे तितक्या लवकर घेण्यात येईल.

मुंबई - गोखले ब्रीजवर हलक्या वाहनांसाठी प्रवेश देता येईल का? याबाबतचा निर्णय जितका लवकर शक्य आहे तितक्या लवकर घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी दिली. टू व्हीलर आणि थ्री व्हीलर वाहनांसाठी या मार्गावर प्रवेश देण्याच्या मुद्द्यावर आयआयटी मुंबई आणि व्हीजेटीआय या दोन्ही संस्थांकडून पालिकेला अहवाल प्राप्त झाले आहेत. या दोन्ही अहवालाचा आठवड्याभरात अभ्यास करण्यात येईल.

त्यानंतरच गोखले ब्रीज हलक्या वाहनांसाठी खुला करता येईल का याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. अहवालाच्या अभ्यासानंतर स्थानिक पातळीवर काय करणे गरजेचे आवश्यक आहे याची खबरदारी घेऊनच  दोन आठवड्यात याबाबतचा अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आयआयटी मुंबई आणि व्हीजेटीआय यांच्या संयुक्त टीमने रविवारी गोखले ब्रीजच्या ठिकाणी संयुक्तपणे पाहणी केली. त्यानंतर काही उपाययोजना करण्यासाठीच्या सूचना त्यांनी मुंबई महापालिकेला दिल्या आहेत. ब्रीजच्या ठिकाणी काही भाग हा मजबूत केल्यास या मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात अशी हलक्या वाहनांसाठी वाहतूक सुरू होऊ शकते असेही त्यांनी दिलेल्या अहवालात नमुद केले होते. त्यानुसारच पाहणी आणि चाचणीच्या नंतरच पालिकेला याबाबतचा निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठीच पालिकेला दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी अपेक्षित असल्याचे वेलरासू यांनी सांगितले. आम्ही शक्य तितक्या लवकर याबाबतचा निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा देऊ असेही ते म्हणाले. 

अंधेरी पूर्व आणि पश्चिम कनेक्टिव्हिटीच्या गोखेले ब्रीजवर सध्या सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे. या ब्रीजला पर्यायी मार्गांवरही काही ठिकाणी जड वाहनांना मज्जाव करण्यात आला आहे. तर पर्यायी मार्गावर टू व्हीलर आणि थ्री व्हीलर वाहनांमुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडत असल्याचे निरीक्षणास आले आहे. त्यामुळे गोखले ब्रीजवर वाहतूक सुरू झाल्यास याठिकाणी मोठा दिलासा मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com