BMC Election 2022 : महापालिकेच्या ओबीसी लॉटरीनंतर ३९ सूचना व हरकती

सूचना हरकती दाखल करण्यासाठी उरला अवघा एक दिवस 
Mumbai Municipal Election 2022  39 objections municipal OBC reservation release
Mumbai Municipal Election 2022 39 objections municipal OBC reservation releasesakal

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ‘बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक - २०२२’ करिता २३६ प्रभागांपैकी निर्धारित जागांसाठीचे ‘आरक्षण निश्चिती’ व सोडत नुकतीच काढण्यात आली. मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांन्वये व त्यानुसार मा. निवडणूक आयोगाच्या सुधारित मार्गदर्शक सुचनांनुसार नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित प्रभाग निश्चिती करण्यासाठी सोडत काढण्यात आली. मुंबई महापालिका आरक्षण सोडतीसाठी ३९ सूचना हरकती आल्या आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मुंबई महापालिका आरक्षण सोडतीसाठी ३९ सूचना हरकती आल्या आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. सूचना हरकती दाखल करण्यासाठी २ ऑगस्टची अंतिम मुदत राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. 

यापूर्वी अनुसूचित जाती, अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती (महिला) या प्रवर्गांसाठी ३१ मे २०२२ च्या सोडतीनुसार आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. तर नुकत्याच झालेल्या सोडतीमध्ये नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गाकरिता आरक्षण निश्चयाने करण्यासह सोडत काढण्यात आली. एकूण २३६ जागांपैकी १५ जागा या अनुसुचित जातीसाठी आहेत. तर २ जागा अनुसुचित जमातीसाठी आहेत. तर६३ जागा नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता लॉटरीच्या माध्यमातून आरक्षित करण्यात आल्या. तर तसेच एकूण २३६ जागांपैकी ११८ जागा महिलांसाठी राखीव; पैकी ८ जागा अनुसूचित जाती (महिला), १ जागा अनुसूचित जमाती (महिला), ३२ जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी; तर ७७ जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असणार आहेत. या सोडतीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाकडे हरकती नोंदविण्यासाठी २ ऑगस्ट २०२२ ही अंतिम तारीख आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी आणखी सूचना आणि हरकती आयोगाकडे दाखल होतील अशी अपेक्षा केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com