Mumbai Municipal Election
esakal
मुंबई : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात निवडणूक (Mumbai Municipal Election) लढवणाऱ्या २६ बंडखोरांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या या बंडखोरांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी ही कारवाई केली.