नरेंद्र मोदींना देशातील शेतकऱ्यांनी हरवले : मेधा पाटकर

किसान महापंचायतीत मेधा पाटकर यांचा दावा
मेधा पाटकर
मेधा पाटकरsakal

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जवळच्या भांडवलदारांसाठी देश विकायला काढला आहे. देशातील अमाप संपत्ती लुटली जात आहे; पण मोदींना आता देशातील शेतकऱ्यांनी हरवले आहे. त्यामुळे त्यांना कृषी विरोधातील कायदे मागे घ्यावे लागले आहेत. आता आमची लढाई ही देश वाचविण्यासाठी आहे. देशाची भांडवलदारांकडून होणारी लूट थांबवण्यासाठी आहे, असे प्रतिपादन नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी आझाद मैदानातील शेतकरी कामगार महापंचायतमध्ये केले.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या वर्षपूर्ती आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईत आझाद मैदानात विराट शेतकरी कामगार महापंचायत भरवण्यात आली. संयुक्त कामगार किसान मोर्चाच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले.

मेधा पाटकर
दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह; महापालिका सतर्क

पाटकर म्हणाल्या की, लॉकडाउनमध्ये भांडवलदारांच्या कंपन्यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी केंद्राने २१ कायदे आणले. ते लागू करावेत म्हणून हिंसा केली जाते. लोक उपाशी मरत आहेत. आता आम्ही हमीभाव घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ४ डिसेंबर रोजी संसदेत काय होईल, ते पाहू आणि नंतर निर्णय घेऊ. शेतकरीविरोधी कायदे मागे घेतले जाणार आहेत, हा आमचा पहिला विजय आहे. पुढे आमची लढाई बाकी आहे, असेही पाटकर म्हणाल्या.

शेतकरी नेत्यांचा फुले पगडीने सत्कार

आझाद मैदानातील शेतकरी कामगार महापंचायतीत शेतकरी नेत्यांचा महात्मा फुले यांच्यासारखी पगडी देऊन सत्कार करण्यात आला. महात्मा जोतिराव फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहून देशातील शेतकऱ्यांची व्यथा मांडली होती. रविवारी त्यांचा स्मृतिदिन होता. या दिनानिमित्त मुंबईत शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यासह योगेंद्र यादव, अतुलकुमार अंजान, तेजिंदर सिंह विर्क, युद्धवीर सिंग, राजाराम सिंग, महिला शेतकरी नेत्या जसबीर कौर नट, नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर आदींचा महात्मा फुले पगडी देऊन सत्कार करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com