esakal | अरे देवा... मुंबईत नव्या कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा 10 हजारांवर
sakal

बोलून बातमी शोधा

अरे देवा... मुंबईत नव्या कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा 10 हजारांवर

दादरमध्ये सर्वाधिक 119 तर धारावीत 62 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची भर

अरे देवा... मुंबईत नव्या कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा 10 हजारांवर

sakal_logo
By
Team eSakal

मुंबई: गेल्या 24 तासात मुंबईत १० हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित आढळले. सोमवारच्या दिवसात मुंबईतील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा १० हजारांच्या खाली गेला होता. पण मंगळवारी पुन्हा एकदा मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येने १० हजारांचा टप्पा गाठला. गेल्या २४ तासात मुंबईत 10 हजार 30 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. तर एकूण 31 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत आज नवे 10 हजार रुग्ण आढळल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 4 लाख 72 हजार 332वर पोहोचला तर सक्रिय रुग्णांनी 77 हजार 495चा टप्पा गाठला.

कामगाराला कोरोना झाल्यास पगाराचं काय? वाचा नवे नियम

आज दिवसभरात 31 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 828 वर पोहोचला. आज मृत्यू झालेल्या 19 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 20 पुरुष तर 12 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 3 रुग्णांचे वय 40 वर्षाच्या खाली होते. 8 रुग्ण 40 ते 60 वयोगटातील होते तर 20  रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते. दरम्यान 7 हजार 19 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 3 लाख 82 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले. मुंबईत सध्या 77 हजार 495 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81 टक्के आहे. कोरोना रुग्ण वाढीचा सरासरी दर 1.79 टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 38 दिवसांवर आला आहे. आतापर्यंत 43 लाख 53 हजार 975 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

मुंबईत 73 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 740 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 32 हजार 928 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये  अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल1,037 करण्यात आले.

सावधान!!! नियम मोडल्यास थेट सोसायटीलाच बसणार दंड; वाचा नवी नियमावली

दादरमध्ये 119, धारावीत 62 नवे रूग्ण

जी उत्तर मध्ये आज 284 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 18910 झाली आहे.धारावीत आज 62 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या 5300 वर पोहोचली आहे. तर 850 सक्रिय रुग्ण आहेत. दादर मध्ये आज सर्वाधिक 119 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 6861 वर झाली आहे तर 1397 सक्रिय रुग्ण आहेत. माहीम मध्ये 103 रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण 6849 इतके झाले आहेत. तर 1508  सक्रिय रुग्ण आहेत.

loading image