esakal | कामगाराला कोरोना झाल्यास पगाराचं काय? वाचा नवे नियम
sakal

बोलून बातमी शोधा

कामगाराला कोरोना झाल्यास पगाराचं काय? वाचा नवे नियम

हॉटेल्स, बार आणि उपहारगृहांबद्दलची नियमावली जाहीर, वाचा सविस्तर

कामगाराला कोरोना झाल्यास पगाराचं काय? वाचा नवे नियम

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. लसीकरण मोहिमेला प्राधान्य देण्यात आलं आहेच. पण राज्यात कोरोना रोखण्यासाठी मिनी लॉकडाउन आणि वीकेंड लॉकडाउनही लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेने नवी नियमावली जाहीर केली असून महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी या संदर्भातील परिपत्रक काढलं आहे. या परिपत्रकात मुंबईत ३० एप्रिलपर्यंत काय सुरू आणि काय बंद याची व्यवस्थित माहिती देण्यात आली आहे. त्याचसोबत कामावर असणाऱ्या एखाद्या कामगाराला कोरोनाची बाधा झाल्यास त्याच्या पगाराबाबत काय निर्णय घ्यावा याबद्दल स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे.

सावधान!!! नियम मोडल्यास थेट सोसायटीलाच बसणार दंड; वाचा नवी नियमावली

अर्थचक्र सूरू ठेवून कोरोनाचा प्रसार रोखणं हा सध्या साऱ्यांचाच मूळ हेतू आहे. त्यामुळे बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी मजूर व कामगारांनी राहणे गरजेचे आहे. या कामरागांना व मजूरांना केवळ साहित्याची वाहतूक करण्यासाठीच परवानगी देण्यात येणार आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे, कोणत्याही कामगारास जर कोविडची बाधा झाली तर त्या कारणासाठी त्याला कामावर काढून टाकता येणार नाही. त्याला आजारी रजा (Sick Leave) द्यावी लागणार असून रजेच्या काळात त्याला पूर्ण पगार द्यावा लागणार आहे, असं नियमावलीत स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच, बांधकामासाठी उपलब्ध करून दिलेल्या कामगारांची आरोग्य तपासणी ठेकेदारानेच करायची आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.

"दोन दिवसांचा लॉकडाउन असल्याने मी सहमती दिली, पण..."

उपहारगृहे, हॉटेल्स आणि बार- उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद राहतील. पण उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर ते तेथे राहणाऱ्या लोकांसाठीच सुरू ठेवता येईल. बाहेरील व्यक्तीसाठी प्रवेश असणार नाही. मात्र 'टेक अवे' किंवा पार्सलची सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी ७ ते रात्री ८ केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल. पार्सलची वाट पाहणाऱ्या ग्राहकांना सुरक्षित अंतर नियमांचे पालन करावे लागेल. मात्र नियमांचे पालन होत नाही असे दिसले तर स्थानिक प्रशासन ते पूर्णपणे बंद करू शकते.

लग्न समारंभ, अंत्यविधीसाठी नियम- लग्न समारंभाला ५० लोकांची उपस्थिती बंधनकारक असणार आहे. याठिकाणी कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करणे गरजेचे आहे. तो पर्यंत आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागणार आहे. अंत्यविधीसाठी २० नागरिकांना परवानगी असेल. स्मशान भूमी आणि दफनभूमीमधील कर्मचाऱ्यांना लसीकरण करावे लागेल तो पर्यंत त्यांना आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल सोबत ठेवावा लागणार आहे.

होम क्वारंटाइन रूग्णांसाठी महत्त्वाची बातमी; वाचा नवा निर्णय

वृत्तपत्र छपाई आणि वितरण सुरु- वृत्तपत्रे छपाई सुरु राहिल. वृत्तपत्र वितरण सकाळी ७ ते ८ या वेळेत नेहमीप्रमाणे  सुरू ठेवण्यात येईल मात्र विक्रेत्यांनी लसीकरण करून घ्यावे.

ई कॉमर्स सेवा- ई कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरूच राहील. होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्या व्यक्तीस १००० रुपये आणि संबधित दुकान किंवा संस्थेस १० हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल.

आतापर्यंत महाराष्ट्रात किती लोकांना मिळाली लस? शासनाने दिलं उत्तर

उद्योग, उत्पादन, चित्रीकरण सुरु- उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरूच राहील मात्र या ठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेलेच पाहिजेत, याची काळजी व्यवस्थापनाने घ्यावी. चित्रीकरण सुरु ठेवता येईल मात्र गर्दीचा समावेश असलेली चित्रीकरणे करू नये तसेच सर्व कर्मचारी व चित्रीकरण स्थळावरील लोकांची आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. १० एप्रिलपासून याची अमलबजावणी होईल.

loading image