
मुंबई : दहीहंडी उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात ‘बोल बजरंग बली की जय’ म्हणत उत्साही वातावरणात गोविंदा पथकांचा महिनाभर आधीपासूनच सराव सुरू असल्याचे दिसून आला आहे. मुलंच नव्हे तर मुलींचा गोपाळकाला निमित्त दहीहंडी फोडण्यासाठी पुढाकार असतो. हंड्या फोडण्यासाठी व मनोरे रचून सलामीसाठी गोविंदा पथकांची चांगलीच कसरत सुरू आहे.