

School Student Dies After Punishment
ESakal
वसई : अपूर्ण अभ्यास किंवा मस्ती केल्यामुळे शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा देतात. मात्र वसईत अशाच शिक्षेमुळे एका लहानग्या विद्यार्थिनीने जीव गमावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसई पूर्वेतील एका शाळेत शिक्षकाने शाळेत उशिरा आल्याने विद्यार्थ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. परंतु यामुळे एका विद्यार्थिनीची तब्येत बिघडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे.