esakal | मुंबईकरांनी घेतला लॉकडाऊन संकेताचा धसका, तोंडावर लागलेत पुन्हा 'मास्क'
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईकरांनी घेतला लॉकडाऊन संकेताचा धसका, तोंडावर लागलेत पुन्हा 'मास्क'

मुंबईत कोरोनाला पसरण्यापासून रोखायचे असल्याने सर्वांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

मुंबईकरांनी घेतला लॉकडाऊन संकेताचा धसका, तोंडावर लागलेत पुन्हा 'मास्क'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : मुंबईत कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने लोकांमध्ये दहशत निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून आता नागरिकांनी मास्क, सामाजिक अंतराबाबत खबरदारी घेण्यास प्रारंभ केला आहे. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियम न पाळल्यास लॉकडाऊनचे संकेत दिल्याने त्याचा धसका घेत अनेकांनी कोरोनाचे नियम पाळण्याकडे लक्ष दिल्याचे आज परिसरात चित्र होते. 

गेल्या चार-पाच दिवसांपासून कोरोना प्रसाराच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही खबरदारीच्या सूचना दिल्या. त्यानंतर आज सकाळपासूनच जेजे रुग्णालय चौक, इमामवाडा, भेंडीबाजार, गिरगाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नगर चौक, फोर्ट, मेट्रो सिनेमा, काळबादेवी परिसरात नागरिकांनी मास्क लावून दैनंदिन व्यवहार सुरू केले. फोर्ट परिसरातील हुतात्मा चौक, उच्च न्यायालय, मरिन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, कलेक्‍टर हाऊस, गेटवे परिसरातही हीच स्थिती होती. पोलिस आयुक्तालय परिसर, जामा मशीद, लोहार चाळ, झवेरी बाजार परिसरातही नागरिक मास्क लावून फिरताना दिसले. अनेक जण सामाजिक अंतराचे नियमही पाळताना दिसत होते. 

महत्त्वाची बातमी : 58 बँक खाती, 171 फेसबुक पेजेस, 5 टेलिग्राम चॅनेल्स आणि 54 मोबाईल्स; सेक्सटॉर्शनच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश

मुंबईत कोरोनाला पसरण्यापासून रोखायचे असल्याने सर्वांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. नागरिकांनी मास्क लावावा. सामाजिक अंतर पाळावे. मोठ्या सभा, समारंभ, गर्दी टाळावी. सर्दी-खोकला असल्यास तत्काळ डॉक्‍टरांशी संपर्क साधावा. "अ' प्रभागात कोरोनाशी लढणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची अँटीजेन चाचणी करण्यात येत आहे असं मुंबई महापालिकेच्या अ प्रभागातील सहाय्यक आयुक्त चंदा जाधव म्हणाल्यात.

तर मुंबईतील गृहिणी संगीत गायकवाड म्हणतात, रेल्वे, बेस्ट, एसटी आणि टॅक्‍सी, इतर खासगी वाहनांत प्रवाशांची गर्दी पाहता कोरोनाचा प्रसार रोखणे कठीण जरी असले तरी अशक्‍य नाही. आम्ही मुंबईकर कोरोनाचा मुकाबला करण्यास समर्थ आहोत. त्यामुळे सरकारने आखून दिलेले सर्व नियम पाळत आहोत. 

महत्त्वाची बातमी : मन सुन्न करणारी घटना ! 11 हजार वोल्ट विद्युत प्रवाह असलेल्या वाहिनीला चिकटली लोखंडी शिडी, शिडीसोबत खेळात होता लहानगा

तर चेंबूरमधील रहिवासी ऐश्वर्या घोलप म्हणाल्यात, गेल्या काही दिवसांतील कोरोनाची आकडेवारी पाहता आम्हाला भीती जाणवू लागली आहे. त्यामुळे स्वतःसह कुटुंबाचीही काळजी घेत आहोत. मास्क, सामाजिक अंतर हे सर्व पाळत आहोत. इतर नागरिकांनीही या नियमांचे पालन करावे. 

mumbai news after hint of lockdown mask are back on mumbaikars face