esakal | लोकहो कोरोना वाढलाय, महापालिकेकडून 'सप्टेंबर'फॉर्म्युला वापरण्यास सुरवात

बोलून बातमी शोधा

लोकहो कोरोना वाढलाय, महापालिकेकडून 'सप्टेंबर'फॉर्म्युला वापरण्यास सुरवात}

कोविडची बाधा झाल्यानंतर लक्षणे नसलेल्या व्यक्तींना गृहविलगीकरणात राहाण्याची मुभा देण्यात येत आहे

लोकहो कोरोना वाढलाय, महापालिकेकडून 'सप्टेंबर'फॉर्म्युला वापरण्यास सुरवात
sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई, ता. 28 : कोविडचे रुग्ण वाढू लागल्यावर महानगर पालिकेने 'सप्टेंबर'फॉर्म्युला वापरण्यास सुरवात केली आहे. यानुसार आता प्रभाग कार्यालयांमार्फत संकुलांना स्मरणपत्र पाठविण्यास सुरवात करण्यात आली आहे. इमारतीच्या आवारात होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी करण्यात आली आहे. यात विशेषतः बाहेरगावावरुन, परदेशातून आलेल्या प्रवाशांची माहिती तत्काळ पालिका प्रभागातील वॉर रुमला कळविण्याची सुचना करण्यात आली आहे.

सप्टेंबर महिन्यात कोविड शिखरावर असताना महानगर पालिकेने यंत्रणा ज्या पध्दतीने राबवली त्याच पध्दतीने आता काम सुरु करण्यात आले आहे. कोविड काळात महानगर पालिकेच्या प्रभाग कार्यालयांमार्फत सर्व निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक संकुलांना लेखी सुचना देण्यात आल्या होत्या.

महत्त्वाची बातमी : चार वर्षाच्या मुलाला सावत्र पित्याकडून इस्त्रीचे चटके; आजीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

त्याच धर्तीवर आताही सुचना देण्यात येत आहे. "कार्यालयांनी 50 टक्के उपस्थीती ठेवावी असे आवाहन करण्यात आले असल्याचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

प्रभाग कार्यालयांमार्फत निवासी संकुलांना लेखी स्मरणपत्र पाठविण्यात आले आहे. त्यात संकुलाच्या आवारात रहिवाशी मास्क वापरतील, सामाजिक अंतर राखतील याची खबरदारी घेण्याची सुचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर बाहेरगावरुन, परदेशातून आलेल्या प्रवाशंची माहिती प्रभागाच्या वॉर रुमला कळविण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.

पालिकेच्या एस प्रभागामार्फत विक्रोळी, कांजूरमार्ग भांडूप परीसरातील संकुलांना अशा नोटीस पाठविण्यास सुरवात झाली आहे.

हे लक्षात ठेवा

  • इमारतीच्या प्रवेशव्दारावर सॅनिटायझर ठेवावा
  • इमारतीच्या आवारात कोणताही सामाजिक कार्यक्रम घेणे टाळावे
  • इमारतीत आणि आवारात मास्क वापरावे, सामाजिक अंतर राखावे


महत्त्वाची बातमी : मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आज मुंबईत 'मोठी' बैठक
 

बाहेरील व्यक्तींना बंदी

इमारतीत घरकामासाठी येणाऱ्यांचे दैनंदिन तापमान तपासणी आणि ऑक्‍सीजन पातळी तपासावी. तसेच, शक्‍य असल्यास काम करणाऱ्या कुटूंबातच राहाण्याची सोय करावी. अशी सुचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर फेरीवाला, कुरीअर बॉय, लॉड्रीवाला, डिलीव्हरी बॉय यांना इमारतीत प्रवेश देऊ नये असा सल्लाही देण्यात आला आहे.

गृहविलगीकरणात असणाऱ्यांवर लक्ष

कोविडची बाधा झाल्यानंतर लक्षणे नसलेल्या व्यक्तींना गृहविलगीकरणात राहाण्याची मुभा देण्यात येत आहे. अशा व्यक्तींवरही लक्ष ठेवावे. ती व्यक्ती घराबाहेर पडत असल्यास अथवा सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्यास तत्काळ प्रभागाच्या वॉर रुमला कळवावे असेही या स्मरणपत्रात नमुद करण्यात आले आहे.

mumbai news BMC is using September formula for controling corona in mumbai