मुंबईकरांच्या मनात लॉकडाउनची भीती, पालिका अधिकाऱ्यांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

मुंबईकरांच्या मनात लॉकडाउनची भीती, पालिका अधिकाऱ्यांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

मुंबई : मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दररोज हजारच्या आसपास करोनाचे रुग्ण आढळत आहेत. करोनाचा हा फैलाव रोखण्यासाठी मुंबईच्या शेजारी असलेल्या ठाण्यासह काही भागांमध्ये पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनाही लॉकडाउनची चिंता सतावत आहे. करोना बरोबर लॉकडाउनचे फटकेही सर्वसामान्यांनी सहन केले आहेत. त्यामुळे आता पुन्हा लॉकडाउन नको, अशीच मुंबईकरांची भावना आहे. 

मुंबईत करोना रुग्णांचे प्रमाण वाढत असले तरी परिस्थिती अजून नियंत्रणात आहे. तात्काळ लॉकडाउन करण्याची आवश्यकता नाही असे वरिष्ठ पालिका अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले. मुंबईत सोमवारी १,००८ करोना रुग्णांची नोंद झाली. महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांना लॉकडाउनबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी, तात्काळ लॉकडाउन लागू करण्याची आवश्यकता नाही असे उत्तर दिले. 

मुंबईत करोना रुग्णांचे प्रमाण वाढतेय, त्यामागे वाढवण्यात आलेली चाचणी संख्या हे सुद्धा एक कारण आहे, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. महापालिकेने चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवले आहे. जानेवारी महिन्यात ११ ते १५ हजार चाचण्यात होत होत्या. तेच प्रमाण आता २० हजारच्या घरात आहे. करोना रुग्ण शोधण्यासाठी सोमवारी मुंबई महापालिकेने एकाचदिवसात २३ हजार चाचण्या केल्या. 

चाचण्यांमधून पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण सहा टक्के आहे. महाराष्ट्रातील अन्य शहरांच्या तुलनेत हे प्रमाण कमी असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून नागरिकांना सातत्याने नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही, तर कठोर पावले उचलावी लागतील असा इशारा प्रशासनाकडून वारंवार दिला जात आहे.

mumbai news corona updates implementation of lockdown will not be immediate in mumbai and mmr

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com