
मुंबईत आगीच्या घटनांचे सत्र सुरूच असून आज पुन्हा एकदा मुंबई विमानतळाजवळील एका हॉटेलला भीषण आग लागली. ही घटना आज दुपारी घडली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या १५ पेक्षा अधिक गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.