Mumbai News : ऐन हिवाळ्यात मुंबईत 'पूर'; घरं, रस्ते पाण्याखाली, सामानही वाहून गेलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ghatkopar
Mumbai News : ऐन हिवाळ्यात मुंबईत 'पूर'; घरं, रस्ते पाण्याखाली, सामानही वाहून गेलं

Mumbai News : ऐन हिवाळ्यात मुंबईत 'पूर'; घरं, रस्ते पाण्याखाली, सामानही वाहून गेलं

घाटकोपरच्या असल्फा विभागात 72 इंचाची जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेलं आहे. आसपास राहणाऱ्या लोकांच्या घरांमध्येही पाणी शिरलं आहे. तसंच पाईपलाईनच्या जागी २० फूट खोल खड्डाही झाला आहे.

पाण्याचा प्रवाहयात अनेक दुचाकी, आजूबाजूच्या घरांचे, दुकानांचे साहित्य वाहून गेले आहे. काल रात्री असल्फा परिसरात 72 इंचाची पाण्याची पाइपलाइन फुटली. या जलवाहिनीतून पाणी इतक्या वेगाने बाहेर आले की अनेक घरे, परिसर आणि रस्ते पाण्याखाली गेले. अचानक घरात आलेल्या पाण्यामुळे गोंधळ उडाला.

हेही वाचा: Mount Mary Church : मुंबईतील माऊंट मेरी चर्चवर लष्कर-ए-तैय्यबाकडून हल्ल्याची धमकी

पाण्याचा दाब इतका होता की सुमारे १० फुटांपर्यंत पाणी उसळत होतं. मध्यरात्री 2 ते 2.30 पर्यंत पाण्याची पाईपलाईन फुटली असल्याची माहिती मुंबई महापालिकेला कळविण्यात आली, मात्र पालिकेचे अधिकारी गैरहजर असल्याचे स्थानिकांनी सांगितले. आता पाणी थांबलं आहे मात्र त्या जागी २० फूट खोल खड्डा पडला आहे.

टॅग्स :Mumbai