गिरगावमध्ये साकारला 12 फुटांचा राजगड!

दिनेश चिलप मराठे
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

मुंबईः 'गिरगाव प्रबोधन' आयोजित किल्ले बांधणी तसेच छायाचित्र व व्यंगचित्र स्पर्धा व प्रदर्शन 2017 हा उपक्रम नुकताच गिरगावातील शारदा सदन या शाळेत पार पडला. यातील मुख्य आकर्षक ठरले ते साकारण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा राजगड किल्ला.
 
या स्पर्धेमध्ये 200 ते 250 स्पर्धकांनी मोठ्या हौशीने भाग घेतला होता. किल्ले स्पर्धे अंतर्गत स्वराज्याची राजधानी असणारा राजगड त्याच प्रमाणे सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, शिवनेरी, सरसगड, जंजीरा, पद्मदुर्ग अशा विविध गडांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या होत्या व हे प्रदर्शन पाहण्यासाठी 20 हजार हुन जास्त प्रेक्षकांनी उपस्थिति लावली होती.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व परिक्षक म्हणून मार्मिक व सकाळसह विविध वर्तमानपत्रासाठी काम करणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस हे उपस्थित होते. त्याच प्रमाणे शिवसेना खासदार अरविंद सावंत व सोबत अनेक राजकीय, सामाजिक नेते मंडळीनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: mumbai news girgaon prabodhan and Forts Competition