अन्यथा पुन्हा इमारती सील केल्या जाणार, कोरोनाचा वाढता आलेख, महापालिका ऍक्शनमध्ये

अन्यथा पुन्हा इमारती सील केल्या जाणार, कोरोनाचा वाढता आलेख, महापालिका ऍक्शनमध्ये

मुंबई, ता. 17 : मुंबईतील काही गृह संकुलांकडून कोविड प्रतिबंधात्मक निर्देशांची पायमल्ली होत असल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा बेपर्वा गृह संकुलांना पालिकेने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. 

यामधेय चेंबूर आणि गोवंडीचा समावेश असणाऱ्या एम पश्चिम विभागात रुग्णासंख्या वेगाने वाढत असल्याचे दिसते. जानेवारी महिन्यात या विभागात दैनंदिन 10 ते 15 रुग्ण आढळत होते. फेब्रुवारी महिन्यात ही संख्या 25 ते 30 वर गेली आहे. त्यामुळे 0.12 वर असणारा रुग्ण वाढीचा दर 0.24 वर पोचल्याने चिंता वाढली आहे. 

चेंबूर, गोवंडी, कुर्ला हा दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या विभाग आहे. मात्र कोरोना नियंत्रणात आल्यापासून या परिसरातील लोकांनी मास्क तसेच सामाजिक अंतर राखण्याकडे कानाडोळा केला आहे. कामानिमित्त अनेक लोकांची मुंबईतील इतर परिसरात ये जा सुरू असते. कौटुंबिक कार्यक्रम, लग्न सोहळे तसेच वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने संसर्ग वाढत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

गृह संकुलांना पाठवलेल्या परिपत्रकात पालिकेने नव्याने निर्देश जारी केले आहेत. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारने घालून दिलेल्या निर्देशाप्रमाणे पालिका कार्यरत आहे. मात्र काही संकुलांमध्ये पालिकेच्या निर्देशाच उल्लंघन होत आहे. यामुळे तेथील रुग्णसंख्या वाढत असून इतर लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे संकुलांना कोविड संदर्भातील निर्देशांचं पालन करावे, अन्यथा इमारत अथवा संकुल सील करण्याची कारवाई करण्यात येईल अशी तंबी पालिकेने परिपत्रकातमध्ये दिली आहे.

1) संकुलात सफाई कर्मचारी/दूधवाला व्यतिरिक्त इतर व्यक्तींना प्रवेश देऊ नये

2) संकुलात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीचे थर्मल स्क्रिनिंग करावे

3) संकुलात बाधित रुग्ण आढळल्यास त्यांना 14 दिवसांचे विलगिकरण बंधनकारक असेल

4) कुटुंबातील इतरांची उच्च जोखीम संपर्क म्हणून सक्तीची चाचणी करून घ्यावी.

5) लक्षणे असलेल्या संशयितांची तात्काळ चाचणी करावी

काही ठराविक विभागामध्ये रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. अनेक गृह संकुल निर्देशांचं पालन करत नाहीत. अशा संकुलांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. नोटिसांकडे दुर्लक्ष केल्यास इमारत सील करण्याची कारवाई करण्यात येईल असं एम पश्चिम विभाग सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे.

mumbai news notices has been sent to housing societies follow covid rules or else buildings will be sealed

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com