Tiger Shroff Firing : “माझ्यावर गोळी झाडण्याची वाट बघताय का?”, टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबारानंतर झीशान सिद्दीकींचा सरकारला सवाल

Zeeshan Siddique : झीशान सिद्दीकी यांनी गेल्या दोन महिन्यांत चार वेळा धमक्या मिळाल्या, तरीही त्यांची सुरक्षा वाढवली नसल्याचा आरोप केला. कलाकार आणि व्यावसायिक सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा कशी होईल, असा सरकारला सवाल विचारला आहे.
Zeeshan Siddique Alleges Security Lapses After Four Death Threats

Zeeshan Siddique Alleges Security Lapses After Four Death Threats

esakal

Updated on: 

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झीशान सिद्दीकी यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. गेल्या दोन महिन्यांत आपल्याला चार वेळा धमक्या मिळाल्या, तरीही सुरक्षा वाढवण्यात आलेली नाही, असा दावा त्यांनी केला. ‘माझ्यावर गोळी झाडली जाईपर्यंत सरकार वाट पाहणार आहे का?’ असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com