
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत पाच 'सायबर कवच' पोलिस स्टेशन्स सुरु करण्यात आले आहेत
मुंबई : लॉकडाउनच्या काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुकीच्या घटनांची नोंद झालीये. जसजसं आपण डिजिटली आपण अधिक सुज्ञ होतोय, तसतसं सायबर गुन्ह्यांचं प्रमाणही वाढतंय. सोबतच सायबर दहशतवादाची भीती देखील बळावतेय. हीच बाब लक्षात घेत मुबई पोलिसांकडून आता खास सायबर गुन्हयांना रोखण्यासाठी विशेष पोलिस स्टेशन तयार करण्यात आले आहेत. या पोलिस स्टेशन्सच्या माध्यमातून मुंबईकरांना आता सायबर कवच मिळणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत पाच 'सायबर कवच' पोलिस स्टेशन्स सुरु करण्यात आले आहेत. या विशेष पोलिस स्टेशन्सच्या माध्यमातून दोन लाख ते पन्नास लाखांपर्यंतच्या फसवणुकींवर लक्ष केंद्रित करून अधिक जलद गतीने गुन्ह्यांची उकल केली जाणार आहे.
या विशेष पोलिस स्थानकांची जबाबदारी पन्नास टक्के महिला पोलिसांवर असणार आहे. या विशेष पोलिस स्थानकांमध्ये कार्यरत पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सायबर कायद्याचं ज्ञान आणि सायबर गुन्ह्यांची उकल करण्याचा अनुभव तर आहेच सोबतच या सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देखील दिलं जाणार आहे.
महत्त्वाची बातमी : "सरकार याच दिवसाची आतुरतेने वाट पाहत होती का ? संजय राऊतांची तिखट प्रतिक्रिया
मुंबईत कुठे असतील ही 'सायबर कवच' पोलिस स्थानके ?
या आधी सायबर गुन्ह्यांसाठी तक्रारदारांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वांद्रे कुर्ला संकुलातील सायबर पोलिस स्थानकावर अवलंबून राहावे लागत होते. मात्र आता मुंबईतील विशेष सायबर पोलिस स्थानकांची संख्या वाढवल्यानानंतर आता एकाच स्थानकावरील कामाचा ताण कमी होणार आहे. सोबतच मुंबईकरांना देखील मोठा फायदा होणार आहे.
महत्त्वाची बातमी : मुंबई पालिका खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी केंद्रे म्हणून घोषित करण्याची शक्यता
किती मनुष्यबळ कार्यरत असणार ?
mumbai news updates CM uddhav thackeray inaugurated five special cyber police stations in mumbai