esakal | नागरिकांनो काळजी घ्या कारण मार्च अखेरपासूनच अंगाची लाही-लाही होणार, वेधशाळेचा अंदाज

बोलून बातमी शोधा

नागरिकांनो काळजी घ्या कारण मार्च अखेरपासूनच अंगाची लाही-लाही होणार, वेधशाळेचा अंदाज}

मुंबई आणि परिसरातील तापमानात गेल्या आठवड्यापासून वाढ झाल्याचे दिसते.

mumbai
नागरिकांनो काळजी घ्या कारण मार्च अखेरपासूनच अंगाची लाही-लाही होणार, वेधशाळेचा अंदाज
sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई :  यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असणार असून, मार्च अखेरपासूनच अंगाची लाहीलाही होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्याचे चटके आतापासूनच बसू लागले असून या आठवड्यापासून तापमानवाढीस सुरुवात होणार असल्याचा अंदाज आहे.

मध्य भारतातील पूर्व तसेच पाश्चिमी भागासह समुद्र किनाऱ्यालगतच्या काही भागातही किमान तापमान  वाढणार असल्याचा अंदाज आहे. वातावरणातील या बदलाची झळ मुंबईसह कोकण परिसराला बसण्याची शक्यता असून येथील कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात उन्हाचे तीव्र चटके सहन करावे लागू शकतात.

महत्त्वाची बातमी : अभ्यासक्रम अपूर्ण असल्याने विद्यार्थी शिक्षकांनी घेतली शिक्षणमंत्र्यांची भेट, केली महत्त्वपूर्ण मागणी

पूर्व भारतातील छत्तीसगड आणि ओडिशा परिसरातील तापमान वाढण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिम भारतातील गुजरात, सौराष्ट्र तसेच कच्छ भागातील तापमानातही वाढ होईल. यासह कोकण, गोवा आणि आंध्र प्रदेशमधील काही समुद्रालगतच्या परिसरातील तापमानही वाढण्याची शक्यता भारतील हवामान विभागाने नोंदवलं आहे.

भारतीय हवामान विभागाने केलेल्या वातावरणीय अभ्यासातून हा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. यंदाचा मार्च ते मे दरम्यानचा हंगाम अधिक उष्ण राहणार असून कमाल तापमानात 0.25 अंश सेल्सियस ने वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

हिमालयच्या पायथ्याशी, ईशान्य भारत, मध्य भारताचा पश्चिम भाग आणि, द्वीपकल्पाच्या भारताच्या दक्षिणेकडील भागांवरील उत्तर भारतातील बहुतांश भागांत सामान्यपेक्षा कमी तापमानाचा संभव आहे. पूर्व आणि लगतच्या मध्य भारतातील बहुतांश उपविभाग आणि देशाच्या उत्तरेकडील भागातील काही उपविभाग सामान्य किमान तापमानापेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. किमान तापमानात 0.03 अंश सेल्सियस ने घट होण्याचा अंदाज आहे. 

महत्त्वाची बातमी : मुंबई 'ब्लॅकआऊट'मागे चिनी सायबर हल्ल्याचा संशय ; गृहमंत्र्यांनी घेतली पत्रकार परिषद, केला महत्त्वाचा खुलासा

मुंबई आणि परिसरातील तापमानात गेल्या आठवड्यापासून वाढ झाल्याचे दिसते. त्यामुळे उन्हाच्या झळा वाढल्याचे दिसते. पुढील काही दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 33 ते 35 अंशाच्या वर जाण्याचा अंदाज आहे. तर किमान तापमान 20 ते 22 अंशाच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात मुंबईतील काही परिसरात उष्णता वाढणार असून कमाल तापमान 38 ते 40 अंशाच्या वर जाण्याचा अंदाज ही वर्तवण्यात आला आहे.

mumbai news this years summers will be nasty says IMD next week temperature might touch forty